Trump's New Policy Video : ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?

Trump’s New Policy Video : ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?

| Updated on: Jan 23, 2025 | 12:13 PM

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे अपुऱ्या कागदपत्रानिशी राहणाऱ्या अनेक भारतीयांना मायदेशी परतावे लागणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. काय आहे त्या मागचं नेमकं कारण?

सत्ता हाती घेताच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे २० हजार भारतीयांना हद्दपार व्हावं लागण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, पुरेशा कागदपत्रांशिवाय किंवा कागदपत्राविनाच अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची संख्या २० हजारांहून अधिक आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या नव्या धोरणांमुळे भविष्यात अमेरिकेत राहणारे भारतीय लोक परत मायदेशी पाठवली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमेरिकेत नोकरी करणारे बहुसंख्य भारतीय H1B Visa मिळवून अमेरिकेत वास्तव्य करताय. याघडीला अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची संख्या ४८ लाखांहून जास्त आहे. पण कायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांनादेखील ट्रम्प यांनी बदललेल्या जन्मतःनागरिकत्वाच्या धोरणावरून अडचण होऊ शकते. यापूर्वी अधिकृत वा अनाधिकृत राहणाऱ्यांच्या मुलानं जर अमेरिकेत जन्म घेतला तर त्याला अमेरिकेचं नागरिकत्व बहाल केलं जात होतं. मात्र आता ट्रम्प यांच्या नव्या धोरणानुसार, अमेरिकन नागरिक, ग्रीनकार्ड धारक आणि सैन्य दलातील सदस्यांच्या मुलांनाच अमेकरिकन नागरिकत्व देण्यात येणार आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट….

Published on: Jan 23, 2025 12:13 PM