कोयता गँगकडून नाही तर मग कोणाकडून पुण्यात उच्छाद?; 30 वाहनांची तोडफोड करणारे रुमाल धारी कोण?
सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता गँगची खूप दहशत आहे. ती पोलीसांकडून मोडीत काढण्याचे काम सुरू असतानाच आता आणखी एका टोळक्याने पोलीसांना आव्हान दिलं आहे. येथे 6 जणांच्या एका टोळक्याने 30 वाहणांची तोडफोड केली.
पुणे : पुण्यात काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत वाढताना दिसत आहे. येथे सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता गँगची खूप दहशत आहे. ती पोलीसांकडून मोडीत काढण्याचे काम सुरू असतानाच आता आणखी एका टोळक्याने पोलीसांना आव्हान दिलं आहे. येथे 6 जणांच्या एका टोळक्याने 30 वाहणांची तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. तर अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण वनशिव वस्ती परिसरात दहशत पसरली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तळजाई परिसरात आज पहाटेच्या सुमारास सहा जणांचे शिरले होते. त्यांच्या हालचालींवरून ते कोणाच्या तरी शोधात असल्याचे होते. मात्र तो न सापडल्याने त्या टोळक्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहणांची तोडफोड केली.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

