साताऱ्यात 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान कास सोहळा भरणार, या आणि इतर अपडेट पहा 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये

साताऱ्यात 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान कास सोहळा भरणार, या आणि इतर अपडेट पहा 36 जिल्हे 72 बातम्यांमध्ये

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Oct 06, 2022 | 6:40 PM

वाशिमच्या कारंजा बाजारसमितीत पावसाचा फटका सोयाबीनला बसला. येथे विक्रीसाठी आणलेला सोयाबीन पावसामुळे भिजला. तर या भिजलेल्या सोयाबीनची बाजारभाव प्रमाणे खरेदी करण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. यादरम्यान सिंधुदुर्गात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर जळगाव जिल्ह्यातील साखरी गावात रस्ता नसल्याने एका महिलेला वेळेत उपचार मिळाला नाही. तर वेळेत उपचार न झाल्याने त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान कोल्हापूरच्या जोतिबा डोंगरावर पारंपारीक सोनं लुटण्याचा सोहळा पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी डोंगरावर हजेरी लावली. तर साताऱ्याच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कास सोहळा भरविण्यात येणार आहे. हा सोहळा 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें