36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM

| Updated on: Aug 18, 2021 | 9:32 AM

या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता प्रवाशांना धैर्याने मार्गदर्शन करत129 भारतीयांना मायदेशी आणलं. श्वेता शंकेच्या कामगिरीचं सध्या देशात कौतुक केलं जातंय.

36 जिल्हे 72 बातम्या | 8.30 AM
36 jilhe 72 batmya
Follow us on

अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या 129 भारतीय व इतर प्रवाश्यांना घेऊन एअर इंडियाच विमान भारतात दाखल झालं. ए आय 244 या विमानाने काबूल विमानतळावर बिकट परिस्थिती असताना उड्डाण घेतले. या एअर इंडियाच्या विमानात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील श्वेता शंके ही हवाई सुंदरी सहभागी होती. तिने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळत जीवाची पर्वा न करता प्रवाशांना धैर्याने मार्गदर्शन करत129 भारतीयांना मायदेशी आणलं. श्वेता शंकेच्या कामगिरीचं सध्या देशात कौतुक केलं जातंय. तिच्या आई वडिलांना श्वेताचा सार्थ अभिमान वाटतोय. अफगाणिस्तानमध्ये एअर इंडियाचं विमान पोहोचलं असताना विमानाला लँडिंग करु दिलं जात नव्हतं. मात्र काही वेळानंतर हे विमान काबूलच्या एअरपोर्टवर उतरलं आणि भारतीयांना सुखरुप परत देखील घेऊन आलं. एअर इंडिया विमानात कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्राची लेक श्वेताचा देखील समावेश आहे. श्वेताच्या आई-वडिलांना याचा सार्थ अभिमान देखील वाटतोय.