4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 01 October 2021
माझ्याकडून वादाला पूर्णविराम देत असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगत वादावर पडदा पाडण्याचं काम केलं आहे. तसेच भुजबळ कुणाला धमकी देत नाही, विनंती नक्की करतात, असं विधानही त्यांनी केलं आहे.
शिवसेना आमदारा सुहास कांदे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराविरोधीतील पुरावे मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सांगितलं. तसेच भुजबळांचं पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणीही केली. त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडून वादाला पूर्णविराम देत असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगत वादावर पडदा पाडण्याचं काम केलं आहे. तसेच भुजबळ कुणाला धमकी देत नाही, विनंती नक्की करतात, असं विधानही त्यांनी केलं आहे.
आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर छगन भुजबळ यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोपांना उत्तर देतानाच वादावर पडदा टाकण्याचंही काम केलं. या वर्षी फक्त नियोजन निधीअंतर्गत केवळ 10 टक्केच रक्कम आली आहे. तसेच हा निधी फक्त कोरोनासाठी वापरण्याचे आदेश आहेत. बाकी पैसे आले की अडचणी दूर करू. माझ्याकडे निधी मागण्यासाठी कोणीही आलं तरी, जिल्हाधिकारी यांनी उचित कारवाई करावी असा रिमार्क असतो, असं भुजबळ म्हणाले.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट

