4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 13 October 2021

पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आलाय. तसा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा खून मुलीच्या नात्यातील व्यक्तीनेच केल्याचे सांगितले जात आहे. मृत मुलगी इयत्ता आठवी वर्गामध्ये शिकत होती. सोमवारी (12 ऑक्टोबर) संध्याकाळी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बिबवेवाडी परिसरात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कबड्डी खेळत होती. यावेळी आजूबाजूला काही छोटी मुलं तसेच इतन नागरिक व्यायाम करत होते. दरम्यान, मुलगी कबड्डी खेळत असताना तिच्याच नात्यातील एका आरोपीने अन्य दोन व्यक्तींसह तिचा खून केला. तिच्यावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स येथे ही घटना घडली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI