4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 23 June 2021

| Updated on: Jun 23, 2021 | 8:41 AM

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद, तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार आहे.

Follow us on

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या 5 जिल्हा परिषद, तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका तेथील कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

धुळ्यात 15, नंदूरबारमध्ये 11,अकोल्यात 14, वाशिममध्ये 14 आणि नागपूरमध्ये 16 जिल्हापरिषद विभागात निवडणुका होणार आहेत. तर, धुळ्यात 30, नंदूरबारमध्ये 14, अकोल्यात 28, वाशिममध्ये 27 आणि नागपूरमध्ये 31 पंचायत समिती निर्वाचक गणामध्ये निवडणुका होणार आहेत.