4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 30 September 2021
कधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. आता ‘गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ ज्या राज्यांना धडकले त्या राज्यांना केंद्राने जरुर भरीव मदत करावी. मात्र हे वादळ प्रत्यक्ष न येताही त्याच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रावर जे भयंकर ‘जलसंकट’ कोसळले आहे त्या महाराष्ट्राचाही विचार करावा.
कधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. आता ‘गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ ज्या राज्यांना धडकले त्या राज्यांना केंद्राने जरुर भरीव मदत करावी. मात्र हे वादळ प्रत्यक्ष न येताही त्याच्या अतिवृष्टीने महाराष्ट्रावर जे भयंकर ‘जलसंकट’ कोसळले आहे त्या महाराष्ट्राचाही विचार करावा. आधी चक्रीवादळ आणि पाठोपाठ अतिवृष्टी अशी संकटांची मालिकाच महाराष्ट्रात सुरू आहे. आता तरी केंद्र सरकार त्याचा विचार करणार आहे का?, असा सवाल आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी विचारला आहे.
तसंच सामान्य माणसाला बाहेर काढण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीतच आहे, पण याची दखल केंद्र सरकारने त्वरित घेतली पाहिजे, एवढी ही आपत्ती मोठी आहे, राज्यातील नद्या-नाले, धरणे-बंधारे तुडुंब भरली असली तरी लाखो एकर शेती उद्ध्वस्त झाल्याने बळीराजाची ओंजळ रिकामीच राहणार आहे. नुकसानीचे पंचनामे, तुमच्या त्या केंद्रीय पथकांचे पाहणी दौरे वगैरे होतच राहतील, आधी तातडीची मदत म्हणून केंद्राने भरीव अर्थसहाय्य महाराष्ट्राला द्यायला हवे. असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

