VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 18 June 2021
सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला सांगितला आहे. सीबीएसईने सांगितले की दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्री बोर्डचा निकालाच्या आधारावर बारावीचा अंतिम निकाल तयार केला जाईल.
सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला सांगितला आहे. सीबीएसईने सांगितले की दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्री बोर्डचा निकालाच्या आधारावर बारावीचा अंतिम निकाल तयार केला जाईल. सीबीएसईचा निकाल 31 जुलैपर्यंत लागेल, अशी माहिती सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल यांनी दिली. त्यासंदर्भात आज बारावी निकालाबाबत बैठक होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई 12 वी परीक्षा 2021 रद्द करण्यात आली होती. याच रद्द करण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल, म्हणजेच या विद्यार्थ्यांना कसे गुण द्यावेत, याचा फॉर्म्युला आज सीबीएसईने कोर्टात सांगितला.
Latest Videos
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

