VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 19 July 2021

मुंबईसह, उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे नवी मुंबईत  जोरदार पावसामुळे  धबधब्यावर अडकून बसलेल्या 116 पर्यटकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.

मुंबईसह, उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे नवी मुंबईत  जोरदार पावसामुळे  धबधब्यावर अडकून बसलेल्या 116 पर्यटकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. नवी मुंबईतील खारघरमधील हे पर्यटक आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे सर्व पर्यटक खारघरच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्यावर पर्यटकासाठी गेले होते. मात्र पावसामुळे डोंगरातून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे हे सर्व पर्यटक धबधब्याजवळ अडकले होते. यामध्ये 78 महिला , 38 पुरुष आणि 5 लहान मुलांचा समावेश होता. या सर्वांना लेडरच्या सहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI