VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 29 November 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्य सरकारला चोहोबाजूंनी घेरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते मंत्र्यांपर्यंत एकेकांवर टीका आणि आरोप करत त्यांची अक्षरशः पिसे काढली. हे सरकार आहे, पण शासन नाही. हे सरकार म्हणजे निव्वळ बदल्यांची फॅक्टरी आहे. कोरोना काळातले मृत्यू या राज्य सरकारने लपवले, असा घणाघात त्यांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्य सरकारला चोहोबाजूंनी घेरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ते मंत्र्यांपर्यंत एकेकांवर टीका आणि आरोप करत त्यांची अक्षरशः पिसे काढली. हे सरकार आहे, पण शासन नाही. हे सरकार म्हणजे निव्वळ बदल्यांची फॅक्टरी आहे. कोरोना काळातले मृत्यू या राज्य सरकारने लपवले, असा घणाघात त्यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारच्या लालफितशाहीमध्ये आगप्रतिबंधक गोष्टीही अडकल्या. भंडाऱ्यात मुलांचा मृत्यू झाला. सरकारने दीड वर्ष कारवाई केली नाही. आग लागू शकते. मात्र, ती कशामुळे लागते. ते शोधून काढणार की नाही. प्रतिबंध करणार की नाही. या साऱ्यासाठी तुम्ही जबादार आहात, असे खडेबोल त्यांनी सुनावले.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

