4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 25 October 2021

समीर वानखेडे आजच दिल्लीला रवाना होणार आहेत. संध्याकाळपर्यंत ते दिल्ली पोहोचणार असून दिल्लीत गेल्यावर त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. खंडणीच्या अँगलनेच वानखेडे यांची चौकशी होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

क्रुझवरील धाडी प्रकरणी पंचांनीच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्याची एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेतली असून वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. वानखेडे यांची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचं एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं. दरम्यान, समीर वानखेडे आजच दिल्लीला रवाना होणार आहेत. संध्याकाळपर्यंत ते दिल्ली पोहोचणार असून दिल्लीत गेल्यावर त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. खंडणीच्या अँगलनेच वानखेडे यांची चौकशी होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

एनसीबी अधिकारी किंवा कोणत्याही व्यक्तीची अजून चौकशी होणार आहे. चौकशी सुरू झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल. दक्षिणी आणि पश्चिमी क्षेत्रातून काही माहिती मिळाली आहे. त्यावरून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI