Scholarship Exam | राज्यात आज शिष्यवृत्तीची परीक्षा, मुंबईत मात्र अचानक परीक्षा रद्दचा निर्णय

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून एकूण 449 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल. यापैकी 290 परीक्षा केंद्र हे पाचवीसाठी तर, 159 परीक्षा केंद्र हे आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निश्‍चित करण्यात आली आहेत.

कोरोना संसर्गामुळे याआधी सात वेळा लांबणीवर पडलेली मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आज होणार आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून एकूण 449 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होईल. यापैकी 290 परीक्षा केंद्र हे पाचवीसाठी तर, 159 परीक्षा केंद्र हे आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निश्‍चित करण्यात आली आहेत. शहर व जिल्ह्यातील मिळून 52345 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI