Nashik | अंगावर फटाके फुटल्याने 7 वर्षाचा शौर्य भाजला

फटाके फोडणे एका सात वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले असून, त्याच्यावर आता नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही परिस्थिती पाहता शौर्यच्या आईने फटाका विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.

फटाके फोडणे एका सात वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतले असून, त्याच्यावर आता नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाशिकच्या इंदिरानगर मधील पांडवनगरीत राहणाऱ्या शौर्य लाखोडे हा सात वर्षांचा मुलगा मित्रांसोबत फटाके फोडत होता. त्यांची रोजप्रमाणेच धमाल मस्ती सुरू होती. ते फटाके पेटवायचे आणि बाजूला फेकायचे. मोठा आवाज व्हायचा. त्यानंतर ही मित्रमंडळी टाळ्या वाजवायची. असा खेळ बराच वेळ रंगला. मात्र, अचानक एका मित्राने फटाका पेटवून बाजूला फेकला. तो नेमका शौर्यच्या अंगावर पडला. त्यामुळे त्याच्या कपड्यांनी पेट घेतला. सोबत फटाकाही वाजला. यामुळे शौर्य मोठ्या प्रमाणात भाजला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही परिस्थिती पाहता शौर्यच्या आईने फटाका विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI