AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Merry Christmas 2023 : बदलापूरकरांना आकर्षित करतोय २२ फुटांचा ख्रिसमस ट्री, सेंट फ्रान्सिस झेवियर्समध्ये लक्षवेधी सजावट

Merry Christmas 2023 : बदलापूरकरांना आकर्षित करतोय २२ फुटांचा ख्रिसमस ट्री, सेंट फ्रान्सिस झेवियर्समध्ये लक्षवेधी सजावट

| Updated on: Dec 25, 2023 | 11:54 AM
Share

बदलापुरातील ४० वर्षांहून जास्त जुने असणारे सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा देखील ख्रिसमस निमित्त संपूर्ण चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, या ठिकाणी चलचित्र प्रतिकात्मक गाईचा गोठा उभारण्यात आलाय

ठाणे, २५ डिसेंबर २०२३ : बदलापुरातील ४० वर्षांहून जास्त जुने असणारे सेंट फ्रान्सिस झेवियर्स चर्चमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा देखील ख्रिसमस निमित्त संपूर्ण चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, या ठिकाणी चलचित्र प्रतिकात्मक गाईचा गोठा उभारण्यात आला असून, यात प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा देखावा साकारण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या चर्चमध्ये मागील वर्षी ख्रिसमस ट्री म्हणून १० फुटांचे झाड बनविण्यात आले होते. मात्र यंदा हे ख्रिसमस ट्री १० ते १५ फूट नव्हे तर, तब्बल २२ फूट उंच उभारण्यात आले आहे. हे ट्री पाहण्यासाठी आता शहरातून सगळ्या जाती धर्माचे लोक इथे येत आहेत. ख्रिसमस ट्रीचा मूळ उद्देश म्हणजे या झाडाचे वरचे टोक हे स्वर्गाची दिशा दाखवत असते. त्यामुळे हे झाड जितके मोठे तेवढ्या स्वर्गाच्या दाराशी माणूस एकरूप होतो. आम्हाला शांतीचा संदेश देणारा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद साजरा करताना, आमच्या सगळ्या जाती बांधवांमध्ये एक महिना आधीपासूनच उत्साह असतो, असे सेंट फ्रान्सिस झेवियार्स चर्च फादर रेमेडिअस गोंसाल्विस यांनी म्हटले.

Published on: Dec 25, 2023 11:54 AM