VIDEO : Mumbai Avighna Park Fire | अविघ्न टॉवरच्या 19व्या मजल्याला भीषण आग, महापौर किशोरी पेडणेकर LIVE

मुंबई येथील करी रोड परिसरातील अविघ्न टॉवरला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 19व्या मजल्याला आग लागल्याची माहीती आहे. आता या सर्व प्रकरणाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोलत आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई येथील करी रोड परिसरातील अविघ्न टॉवरला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 19व्या मजल्याला आग लागल्याची माहीती आहे. आता या सर्व प्रकरणाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोलत आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. करी रोड परिसरात असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न टॉवर या टोलेजंग इमारतीमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. 19 व्या मजल्यावर आग लागल्यानंतर दुरुन आगीचे लोट आणि काळसर धूर दिसत होता. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI