Solapur | सोलापुरात मासे वाहतूक करणारा ट्रक पलटला

सोलापुरात मासे घेऊन येणारा ट्रक पलटी झाला. या ट्रकमधील मासे रस्त्याच्या कडेला पडले. त्यामुळे पडलेले मासे घेण्यासाठी लहानमुलासह आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली.

सोलापुरात मासे घेऊन येणारा ट्रक पलटी झाला. या ट्रकमधील मासे रस्त्याच्या कडेला पडले. त्यामुळे पडलेले मासे घेण्यासाठी लहानमुलासह आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली. विजापूर सोलापूर रोडवरील संभाजी महाराज तलावाजवळ मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला.
ट्रक पलटी होताच त्यातील जिवंत मासे तलावाच्या सुकत चाललेल्या घाण पाण्यात पडले. या घटनेची माहिती शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर मासे पकडण्यासाठी चिखलात नागरिकांची मोठी झुंबड उडाली.