भरधाव डम्परचा आवाज आला, अन् क्षणात उडी मारली म्हणून ठाकरे गटाचा खासदार थोडक्यात बचावला

एका टिप्पर चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवीत तो खासदार ओमराजे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दैवबलवत्तर म्हणून अनर्थ टळला. ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खाली उडी मारली. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला.

भरधाव डम्परचा आवाज आला, अन् क्षणात उडी मारली म्हणून ठाकरे गटाचा खासदार थोडक्यात बचावला
| Updated on: Jun 10, 2023 | 8:03 AM

धाराशिव : धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी व्यायाम करायला जात असताना थोडक्यात बचावले. एका टिप्पर चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवीत तो खासदार ओमराजे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दैवबलवत्तर म्हणून अनर्थ टळला. ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खाली उडी मारली. त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात वाचला. त्यानंतर त्या टिप्परचा पाठलाग करीत एकास पकडले. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून एका आरोपीस अटक देखील करण्यात आलीये. निंबाळकर हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथील आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच गेले होते. व्यायाम करून घरी परतत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्परचा त्यांना आवाज आला. खासदार निंबाळकर यांनी पाठीमागे वळून पाहिले तर डम्पर मोठ्या वेगाने त्यांच्या दिशेने येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी यांनी रोडच्या खाली उडी मारली. तेव्हा डंपर पुढे निघून गेला होता. मात्र पाठलाग करून त्याला पकडले.

Follow us
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.