अकोल्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात चौघांचा दुर्दैवी मृत्यू, काय घडली घटना?
VIDEO | अकोल्याच्या बाळापुरात बाबजी महाराज मंदिरातील शेडवर कोसळलं भलंमोठं झाडं, घटनेत काहींचा दुर्दैवी मृत्यू
अकोला : अकोला जिल्ह्यातल्या पातुर तालुक्यात पुन्हा गारपीट झाल्यानं शेतकरी हवालदील झाल्याचे पाहायला मिळाले. आज संध्याकाळी 4.30 च्या सुमारास पुन्हा पातुर तालुक्यातल्या कोठारी, अस्टूल पास्टूल भागात बोरा एवढी गारपीट झाली. जोरदार वाऱ्यासह गारपीट झाल्याने अशाचप्रकारे नुकसान 30 मार्च रोजी देखील झाले होते. या गारपिटीमुळे गहू, आंबा, लिंबू आणि कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच अकोल्याच्या बाळापुरात बाबजी महाराज मंदिरातील शेडवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर काही लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
Published on: Apr 09, 2023 10:30 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

