AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याचा बर्थ डे सेलिब्रेट करायला गेले त्याचाच मृत्यू झाल; लोणावळ्यात दोन वर्षाचा मुलगा स्विमींग पुलमध्ये बुडाला

ज्याचा बर्थ डे सेलिब्रेट करायला गेले त्याचाच मृत्यू झाल; लोणावळ्यात दोन वर्षाचा मुलगा स्विमींग पुलमध्ये बुडाला

| Updated on: Jul 19, 2022 | 5:46 PM
Share

नाशिकचा पवार परिवार या २ वर्षीय चिमुरड्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात(Lonavala) एका व्हीलावर गेला होता. या ठिकाणी २ वर्षीय शिवबा खेळत मग्न होता. तो एकटाच खेळता खेळता स्विमिंग पुल परिसरात आला. आणि तसाच खेळात त्याचा स्विमिंग पूल मध्ये तोल गेला. स्विमिंग पूलमध्ये पडल्यावर या चिमुकल्याने तब्बल 15 मिनिटे वाचण्यासाठी अथक परिश्रम केले. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर त्याचे हातपाय थकले आणि त्याचा जीव गेला. 

लोणावळा: नाशिकमधील २ वर्षाच्या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये(swimming pool ) बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडलीये. शिवबा पवार असं या मृत चिमुरड्याचे नाव आहे. ही घटना समोर येताच शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेत.  नाशिकचा पवार परिवार या २ वर्षीय चिमुरड्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात(Lonavala) एका व्हीलावर गेला होता. या ठिकाणी २ वर्षीय शिवबा खेळत मग्न होता. तो एकटाच खेळता खेळता स्विमिंग पुल परिसरात आला. आणि तसाच खेळात त्याचा स्विमिंग पूल मध्ये तोल गेला. स्विमिंग पूलमध्ये पडल्यावर या चिमुकल्याने तब्बल 15 मिनिटे वाचण्यासाठी अथक परिश्रम केले. मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. अखेर त्याचे हातपाय थकले आणि त्याचा जीव गेला.  दरम्यान बराच वेळ झाला मुलगा दिसत नाही म्हणून परिवाराने त्याची शोधाशोध सुरू केली. सर्व विला पालथा घातला आणि शेवटी मुलाच्या आई वडिलांचे पाय स्विमिंग पुलकडे वळले. स्विमिंग पुलजवळ येताच आई वडिलांना त्यांच्या मुलाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. हे दृश्य पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि आई वडिलांनी जोरात हंबरडा फोडला. हा सर्व प्रकार स्विमिंग पूल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. त्यासोबतच या घटनेतून लहान मुलांची बारकाईने काळजी घेणे किती गरजेचे असा धडा इतर पालकांना मिळतोय.
Published on: Jul 19, 2022 05:46 PM