Parbhani Marathon Running Lady Viral | साडी नेसलेल्या महिलेनं मॅरेथॉन स्पर्धा जिंकली, व्हिडीओ व्हायरल

विशेष म्हणजे मंगल यांनी या स्पर्धेसाठी कुठलीही पूर्वतयारी केली नव्हती. शिवाय त्यांच्या पायात बूट किंवा चप्पल सुद्धा नव्हती. अशा विपरीत परिस्थितीवर मात करीत मंगल यांनी मॅरेथॉन जिंकली.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 17, 2022 | 11:07 PM

परभणी : पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत साडी नेसलेल्या 45 वर्षीय शेतकरी गृहिणीने धो-धो धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकत दहा हजार रुपयाचा पारितोषिक सहित उपस्थितांचे मने जिंकली. मॅरेथॉन स्पर्धेत धावणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. मंगल आव्हाड असं या गृहिणीचं नाव असून, सोनपेठ नगरपालिकेकडून स्वातंत्रताच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत या गृहिणीने भाग घेतला होता. विशेष म्हणजे मंगल यांनी या स्पर्धेसाठी कुठलीही पूर्वतयारी केली नव्हती. शिवाय त्यांच्या पायात बूट किंवा चप्पल सुद्धा नव्हती. अशा विपरीत परिस्थितीवर मात करीत मंगल यांनी मॅरेथॉन जिंकली. त्यामुळे जिल्हाभरातून मंगल यांचं कौतुक होत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें