Aaditya Thackeray : ‘त्या’ 22 आमदारांपैकी एक जण व्हॉईस कॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योग धंदे…  आदित्य ठाकरेंचा बड्या मंत्र्यावर निशाणा

Aaditya Thackeray : ‘त्या’ 22 आमदारांपैकी एक जण व्हॉईस कॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योग धंदे… आदित्य ठाकरेंचा बड्या मंत्र्यावर निशाणा

Harshada Shinkar | Updated on: Dec 08, 2025 | 4:36 PM

आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी गटातील 22 आमदार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या तालावर नाचत असल्याचा दावा केला आहे. यापैकी एक जण स्वतःला व्हाईस कॅप्टन म्हणत असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले. यावर निलेश राणे यांनी ठाकरेंना ज्योतिषी संबोधत प्रत्युत्तर दिले.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी गटातील 22 आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर काम करत असून, त्यातील एक जण स्वतःला व्हाईस कॅप्टन म्हणवत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. गेल्या वर्षभरातील या आमदारांना मिळालेला निधी आणि त्यांची कार्यपद्धती पाहता ते मुख्यमंत्र्यांच्या उठ म्हटल्यावर उठ अशा सूचनेवर नाचत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

या दाव्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का?” असा सवाल उपस्थित करत, राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडे आता केवळ 20 आमदार उरले असल्याचा टोला लगावला. राणे यांनी आदित्य ठाकरे यांना अनावश्यक आणि ज्या विषयांवर त्यांची ताकद नाही, अशा विषयांवर बोलण्याऐवजी विधायक आणि चांगल्या सामाजिक विषयांवर चर्चा करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्याने शिवसेना एकच असून, मिंधे गटाने (शिंदे गट) सर्वकाही चोरले असल्याचा आरोप करत, त्यांना शिवसेना म्हणणे योग्य नसल्याचे म्हटले.

Published on: Dec 08, 2025 4:36 PM
Follow Us