AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....

CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर…..

| Updated on: Oct 12, 2026 | 12:44 PM
Share

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या सीजीपी आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, नितीन सरदेसाई यांच्यासह ३०० हून अधिक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात रविवारी झालेल्या सीजीपी आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी अनेक नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि नितीन सरदेसाई यांच्या नावांचा यात समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलिसांनी ही कारवाई केली असून, विनापरवानगी जमाव जमवणे आणि परवानगी नसताना आंदोलन करणे हे या गुन्ह्यांचे मुख्य कारण आहे. हे नेते पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणात केवळ नेत्यांवरच नव्हे, तर ३०० हून अधिक विद्यार्थ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे आंदोलनाच्या नियमावलीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Oct 12, 2026 12:44 PM

Follow Us