आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्याजवळील हिंजवडी परिसरात भेट देऊन तेथील वाहतूक कोंडीची समस्या आणि मेट्रो प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. चाकणमधून काही कंपन्या बाहेर जाण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी हिंजवडीला भेट दिली आहे. हिंजवडीतील लक्ष्मी चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवते, ज्यामुळे येथील आयटीयन्सना मोठा त्रास होतो. ही कोंडी कमी करण्यासाठी हिंजवडी-मान-शिवाजीनगर मेट्रो […]
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्याजवळील हिंजवडी परिसरात भेट देऊन तेथील वाहतूक कोंडीची समस्या आणि मेट्रो प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. चाकणमधून काही कंपन्या बाहेर जाण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी हिंजवडीला भेट दिली आहे.
हिंजवडीतील लक्ष्मी चौक परिसरात वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवते, ज्यामुळे येथील आयटीयन्सना मोठा त्रास होतो. ही कोंडी कमी करण्यासाठी हिंजवडी-मान-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ही मेट्रो सुरू झाल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन आयटीयन्सना फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
अनेक वेळा मेट्रोच्या उद्घाटनाची वेळ निश्चित करूनही ती अद्याप सुरू झालेली नाही. १५ ऑगस्ट रोजी मेट्रो सुरू होण्याची शक्यता होती, मात्र अद्यापही काम रखडलेले आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मेट्रो स्थानकासह वाहतूक कोंडी असलेल्या प्रमुख चौकांची पाहणी केली. अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रोचे काम कधी पूर्ण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 18, 2026 03:14 PM
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
