Abhijeet Dipke | भाजपने घाबरण्याची गरज नाही, ED-CBI तुमचीच!; अभिजीत दिपके यांचा थेट टोला
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनाबाबत होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. आंदोलनाला बांग्लादेश किंवा नेपाळमधील घडामोडींशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी अशा तुलना पूर्णपणे चुकीच्या असल्याचे म्हटले आहे.
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलनाबाबत होत असलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. आंदोलनाला बांग्लादेश किंवा नेपाळमधील घडामोडींशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी अशा तुलना पूर्णपणे चुकीच्या असल्याचे म्हटले आहे.
अभिजीत दिपके यांनी सांगितले की, कॉकरोच जनता पार्टीला अल्पावधीतच देशभरात वेगळी ओळख मिळाली. सुरुवातीला आंदोलनाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, दुसऱ्या टप्प्यात देशभरातील Gen Z विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढल्यानंतर सरकारने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आंदोलनातील काही प्रमुख मागण्या मान्य केल्या आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
PTI ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत दिपके यांनी बांग्लादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. “आमच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी बांग्लादेश आणि नेपाळचा संदर्भ दिला जात आहे. मात्र, आमच्या आंदोलनाचा त्या घटनांशी कोणताही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, “भारतातील विद्यार्थ्यांना बांग्लादेश किंवा नेपाळकडे पाहण्याची गरज नाही. आमच्याकडे महात्मा गांधी यांच्या अहिंसेचे आणि संविधानाचे विचार आहेत. दिल्लीतील आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संयम राखत लोकशाही पद्धतीने आपल्या मागण्या मांडल्या.”
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे देशभरात मोठी चर्चा रंगली होती. आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आणि अभिजीत दिपके यांच्या ताज्या वक्तव्यानंतर या आंदोलनाच्या स्वरूपावर आणि त्यावरील राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Aug 04, 2026 03:15 PM
भाजपने घाबरण्याची गरज नाही, ED-CBI तुमचीच!; अभिजीत दिपकेंचा थेट टोला
मोठी बातमी! 6 महिन्यांच्या आतच... माणिकराव कोकाटेंच्या संदनिका वाटप...
गुंगी गुडियावरून राजकारण पेटलं!; मुंडेंनी काँग्रेसला दिलं सडेतोड उत्तर
धारशिवमध्ये तुफान राडा; जोरदार हाणामारी, गाड्या फोडल्या, दोन पक्ष...

