Abhijit Bichukale Video : ‘…मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार’, शरद पवारांच्या भेटीनंतर अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार हे राजकारणातील भीष्म पितामह आहे. काही लोकांनी त्यांची भीष्म पितामहासारखी अवस्था केली आहे. मात्र, आगामी काळामध्ये शरद पवार यांनी मला बोलावणं धाडलं, तर मी श्रीकृष्ण प्रमाणे त्यांचं सारथ्य करायला तयार आहे, असं बिचुकले म्हणाले.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आतापर्यंत अनेकदा निवडणुका लढवल्या मात्र एकाही त्यांना कोणत्याही निवडणुकीत यश आलं नाही. मात्र तरीही त्यांनी कधी हार मानली नाही. अभिजीत बिचुकले हे त्यांच्या काही वक्तव्याने काय चर्चेत असतात. अशातच पुण्यात मोदी बाग येथे असलेल्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये योग्यवेळी प्रवेश करेल असं सांगितलं. अभिजीत बिचुकले यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी शरद पवार भीष्म पितामह, मी त्यांच्या श्रीकृष्ण व्हायला तयार असल्याचेही अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर वेळ येईल तेव्हा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करेन असंही अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं आहे. ‘राजकारणातील भीष्म पितामह म्हणजे शरद पवार हे आहेत. त्यांची भेट मी घेतली. त्यांच्याकडून मला बोलावणं आलं. तेवढं मी स्वाभिमानाने जीवन जगलो’, असं अभिजीत बिचुकले यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटले. दरम्यान, शरद पवार आणि माझ्या भेटीतील सारांश मी एवढाच सांगेल की राजकीय भीष्म पितामह आणि इतर लोकांनी केलेली त्यांची अवस्था.. आणि येणाऱ्या काळात अभिजीत बिचुकले ग्वाही देतो जर शरद पवार यांनी मला परत बोलवलं तर त्यांचं सारथ्य करायला मी तयार आहे.’, असं अभिजीत बिचुकले यांनी म्हटलंय.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
