बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर अपघात, वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गवर बोरघाटात दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रक पलटल्याने हा अपघात झाला.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गवर बोरघाटात दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ट्रक पलटल्याने हा अपघात झाला. बोरघाटात खोपोलीच्या हद्दीतील ही घटना आहे. सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकला तांदूळ वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने तांदळाचं ट्रक झाला एक्स्प्रेस वेवर आडवा झाला. यामुळे सर्वत्र तांदुळ विखुरलं गेलं. या अपघातात ट्रकमधील चालक आणि क्लिनर आत अडकले होते. जखमींना बाहेर काढण्यात देवदूत रेस्क्यू टीम, आयआरबी कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांना यश मिळालं आहे.
Published on: Jun 16, 2022 01:35 PM
Latest Videos
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?

