Uday Samant | आरोग्यभरती प्रक्रियेत अडथळ आणणाऱ्यांवर कारवाई : उदय सामंत

जर ऑडिओ क्लिप बाहेर येत असतील आणि मुलांच्या भरती प्रक्रियेत जर कोणी पैसे खात असेल तर त्याच्यावर कारवाई होऊन तो जेलमध्ये गेला पाहिजे. त्याच्यावर एफआयआर दाखल करून त्याला तुरूंगात टाकण्याची व्यवस्था मी करेन, असे उदय सामंत यांनी सांगितले.

| Updated on: Sep 27, 2021 | 8:45 PM

सिंधुदुर्ग : अवघ्या 12 तासांवर परीक्षा आलेली असताना रात्री उशिरा सरकारने आरोग्य भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षा घेण्यास कंपनी असमर्थ आहे, असं कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं शनिवारी प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र या परीक्षेच्या नियोजनाचं काम ज्या न्यासा कम्युनिकेशन या कंपनीला आरोग्य विभागाने दिल होतं त्या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबत आज उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारचा घोटाळा झाला असेल आणि कोणी यामध्ये दलाली करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर ऑडिओ क्लिप बाहेर येत असतील आणि मुलांच्या भरती प्रक्रियेत जर कोणी पैसे खात असेल तर त्याच्यावर कारवाई होऊन तो जेलमध्ये गेला पाहिजे. अशा प्रकारचं जर कुठे होतं असेल आणि त्याची तक्रार माझ्यापर्यंत आली आणि ती पुराव्यानिशी असेल तर ज्या माणसाने असं कृत्य करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यावर एफआयआर दाखल करून त्याला तुरूंगात टाकण्याची व्यवस्था मी करेन, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.