Saif Attack Update : सैफवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटणार? मुंबईतील 'या' गजबजलेल्या स्टेशनच्या CCTV मध्ये कैद अन्...

Saif Attack Update : सैफवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटणार? मुंबईतील ‘या’ गजबजलेल्या स्टेशनच्या CCTV मध्ये कैद अन्…

| Updated on: Jan 17, 2025 | 1:05 PM

मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीमकडून या प्रकरणात तपास सुरू कऱण्यात आला आहे तर एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायकदेखील याप्रकरणी तपास करत आहे. इतकंच नाहीतर वांद्रे पोलीस ठाण्याने हल्लेखोरांच्या शोधासाठी सात टीम केल्या आहेत.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांकडून वेगाने तपास सुरू करण्यात आला आहे. या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने चांगलीच कंबर कसली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीमकडून या प्रकरणात तपास सुरू कऱण्यात आला आहे तर एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायकदेखील याप्रकरणी तपास करत आहे. इतकंच नाहीतर वांद्रे पोलीस ठाण्याने हल्लेखोरांच्या शोधासाठी सात टीम केल्या आहेत. अशा प्रकारे हल्लेखोरांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या एकूण 15-20 टीमकडून सध्या तपास वेगाने सुरू आहे. सैफवर मध्यरात्री त्याच्याच घरात घुसखोरी करून चाकूने हल्ला करणारा आरोपी नेमका कोण? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मुंबईतील एका गजबलेल्या वांद्रे स्टेशन जवळच्या CCTV मध्ये कैद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यानंतर पोलिसांकडून वेगळाच संशय व्यक्त करण्यात येत आहे. सैफवर हल्ला करणारा हा व्यक्ती नालासोपारा, वसईच्या दिशेने जात असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Published on: Jan 17, 2025 01:05 PM