Ketaki Chitale : …त्यानं भोकं पडताय का? हिंदी-मराठीच्या वादात केतकी चितळेची उडी अन् ओकली गरळ
मराठी न बोलल्याने मराठी भाषेला भोक् पडतात का असा सवाल करत केतकी चितळेने मराठी हिंदीच्या वादात उडी घेतली. केतकीच्या या वक्तव्यांनंतर सामान्य मराठी जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली तर वायफळ वक्तव्य करून चर्चांमध्ये राहण्याची काहींना सवय असते असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे आता एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. मराठी हिंदीच्या वादात उडी घेत केतकी चितळे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मराठी भाषेच्या अभिजात दर्जा वरूनही केतकी चितळे यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यात आधीच हिंदी मराठी भाषेचा वाद उफाळलाय. अशातच स्वतः मराठी असूनही केतकीने मराठी बाबत मोठी गरळ ओकली आहे. केतकीच्या या वक्तव्यानंतर सामान्य मराठी जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केतकीवर जोरदार टीका केली आहे. तर यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही केतकीला प्रत्युत्तर देत तिच्या मुलांना मराठी शाळेत घालण्याचा सल्ला दिला आहे. यासह महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी भाषेचा सन्मान करायलाच हवा असे म्हणत ग्रामीणचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही इशारा दिलाय. बघा काय म्हणाली केतकी चितेळ?
Published on: Jul 26, 2025 11:03 AM
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
