अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने शाडूच्या मातीपासून साकारला श्रीगणेशा
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने स्वत:च्या घरीच बाप्पाचं इको फ्रेंडली रुप साकारले आहे. तिच्या भावाने याकामी तिला मदत केलेली आहे.
गणरायाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून राजकीय आणि कलाकार मंडळींच्या घरीही बाप्पाचे दणक्यात आगमन झालेले आहे. अनेक जण आता गणपतीची आरास करताना किंवा गणपतीची मूर्ती निवडताना इको फ्रेंडली पदार्थांपासून तयार असलेली मूर्ती निवडत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीच्या घरीही दरवर्षी प्रमाणे बाप्पाचे आगमन झालेले आहे. यंदाही सोनाली कुलकर्णी हीचा भाऊ अतुल याच्या मदतीने गणपतीची मूर्ती इको फ्रेंडली पद्धतीने साकारली आहे. या मूर्तीला घडवण्यासाठी शाडूच्या मातीचा वापर केलेला आहे. हा गणपती हत्तीच्या चेहऱ्यातून बाहेर येतो अशी संकल्पना वापरण्यात आली आहे. या गणपतीच्या डेकोरेशनसाठी मनीप्लांटच्या खरोखरच्या वेलींचा वापर केला आहे. त्यामुळे डेकोरेशनही नैसर्गिकपणे केलेले आहे. बाप्पाची कृपा अशीच आपल्या सर्वांवर राहो आणि नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण होवो अशी प्रार्थना बाप्पाच्या चरणी केल्याचे सोनाली कुलकर्णी हीने म्हटले आहे.

