72 वर्षांनंतर साने गुरुजी यांची कर्मभूमी पुन्हा साहित्य प्रेमींनी गजबजणार, साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. जळगावसह संपूर्ण खान्देशी संस्कृतीचे दर्शन यात घडविण्यात आलं आहे. लेखणी, केळीची पानं, मराठीचा म, बहिणाबाईंचा जातं, ग्रामीण भागाचं वाद्य संबंळ, आदिवासी वाद्य तरपा यांचा यात समावेश करण्यात आलाय.
जळगाव : 2 ऑक्टोबर 2023 | अमळनेर येथे 2, 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. अमळनेर ही साने गुरुजी यांची कर्मभूमी. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तब्बल 72 वर्षानंतर पुन्हा एकदा ही कर्मभूमी साहित्यप्रेमीच्या सहवासाने गजबजणार आहे. 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राला दिशा देणारे हे मराठी साहित्य संमेलन होईल असा विश्वास मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी कवियत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी उपस्थित होते. संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. यात प्राचार्य मिलिंद भामरे यांनी साकारलेल्या बोधचिन्हाची सर्वानुमते निवड करण्यात आली.

शिवानी सुर्वे-अजिंक्य नानावरेच्या नात्याला 4 वर्षांनंतर कुटुंबीयांची परवानगी; लवकरच करणार लग्न

बाईकवर आता नाही वाजणार थंडी, हे गॅझेट मोठे उपयोगी

बजेट आहे टाईट, 10 हजारामध्ये खरेदी करा हे 5G स्मार्टफोन

करोडोची नोकरी सोडली, खासदारकीही गेली, कोण आहेत महुआ मोइत्रा?

या स्टॉकने राकेश झुनझुनवाला झाले बाजारातील 'बिग बुल'

मल्टीकलर साडीमध्ये खुलले मीरा कपूरचे सौंदर्य..
Latest Videos