AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule : विधानसभेत 200 तर लोकसभेत 45चा आकडा पार करून दाखवणार, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

Chandrashekhar Bawankule : विधानसभेत 200 तर लोकसभेत 45चा आकडा पार करून दाखवणार, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

| Updated on: Aug 12, 2022 | 5:40 PM
Share

गावाच्या अध्यक्ष पदापासून ते महाराष्ट्र अध्यक्षांपर्यंत माझ्यावर पक्षाच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केला, तो विश्वास मी पूर्ण करीन, असे म्हणत भाजपा (BJP) आणि शिवसेना लोकसभेमध्ये 45पेक्षा अधिक जागा जिंकेल आणि महाराष्ट्रात दोनशे विधानसभा निवडून आणेल, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानतो. महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांचेही खऱ्या अर्थाने आज आभार मानतो, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी दिली, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. या जबाबदारीतून मला पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी हा जो नंबर एक पक्ष आमचा आहे, महाराष्ट्रामध्ये अजून नंबर एक कसा करता येईल, अजून त्याला आपल्या पक्षाला प्रचंड मोठं कसं करता येईल, हे पाहायचं आहे, असे म्हणत त्यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत. गावाच्या अध्यक्ष पदापासून ते महाराष्ट्र अध्यक्षांपर्यंत माझ्यावर पक्षाच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केला, तो विश्वास मी पूर्ण करीन, असे म्हणत भाजपा (BJP) आणि शिवसेना लोकसभेमध्ये 45पेक्षा अधिक जागा जिंकेल आणि महाराष्ट्रात दोनशे विधानसभा निवडून आणेल, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.