मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरेंना ‘या’ पक्षांकडून ऑफर, तात्या कोणता पक्ष निवडणार?
मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करत वेगळी वाट धरणार असल्याचे वसंत मोरे यांनी काल स्पष्ट केलं. पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नव्हती. म्हणून पक्ष सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, असे वसंत मोरे म्हणाले. दरम्यान पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांना कुणी दिली ऑफर?
पुणे, १३ मार्च २०२४ : मनसे नेते वसंत मोरे यांनी काल मनसेला सोडचिठ्ठी दिली. वसंत मोरे यांच्या या निर्णयामुळे मनसेला पुण्यात मोठा फटका बसला. मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करत वेगळी वाट धरणार असल्याचे वसंत मोरे यांनी काल स्पष्ट केलं. पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नव्हती. म्हणून पक्ष सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, असे वसंत मोरे म्हणाले. दरम्यान पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांना ठाकरे गट, अजित पवार गट आणि काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली. संजय राऊत यांनी थेट फोन करत त्यांना याबाबत विचारणा केली. तर अजित पवार गटातील रूपाली पाटील यांनी जाहीरपणे राष्ट्रवादीत स्वागत असल्याचे म्हटले. तर वसंत मोरे यांच्याशी दोन ते तीन पक्षांनी संपर्क साधला आहे. स्वत: वसंत मोरे यांनी ही माहिती दिली. “काँग्रेसकडून मला विचारणा करण्यात आली आहे, माजी आमदार मोहन जोशींचा फोन आला होता तसच उद्धव ठाकरे गटाने सुद्धा त्यांना ऑफर दिली आहे” असं ते म्हणाले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

