शरद पवार यांच्यानंतर आता अजित पवार यांची उद्या बीडमध्ये उत्तरसभा, कोणत्या मुद्द्यावर बोलणार?
VIDEO | अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट झाले, त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार आमने-सामने, उद्या अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा; शरद पवार यांच्या सभेला देणार उत्तर?
बीड, २६ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटातील धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात जाहीर सभा घेतली होती. यानंतर आता उद्या अजित पवार यांची बीडमध्ये सभा आहे. या सभेद्वारे अजित पवार शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देणार की आणखी कोणत्या मुद्द्यावर बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. अजित पवार यांच्या उत्तर सभेला अनेक मंत्री आणि नेते येतायेत. अजित पवार यांच्या स्वागतासाठी बीड शहर भरातून विविध बॅनर लावण्यात आले आहेत. इतकेच नाही तर स्वागत कमानी देखील रस्त्याच्या मध्ये उभ्या करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरात मोठी बॅनरबाजी करण्यात आलीय. रस्त्याच्या दुतर्फा ध्वज लावण्यात आले आहेत. पहिल्यांदाच बीड नगरी दुमदुमली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

