AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार, पाहा ‘या’ व्हिडीओत नेमकं काय?

मुंबई-गोवा महामार्गावरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. सध्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामांसाठी अवजड वाहनांना गणेशोत्सवपर्यंत अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी करण्यात आली आहे. असं असताना मुंबई-गोवा महामार्गावरील एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार, पाहा 'या' व्हिडीओत नेमकं काय?
| Updated on: Aug 26, 2023 | 11:07 PM
Share

मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : मुंबई-गोवा महामार्ग सातत्याने वादात असतो. हा महामार्ग पावसाळ्यात प्रचंड चर्चेत येतो. पावसाळ्यात या महामार्गावर रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे तेच कळत नाही. या महामार्गावर नेहमी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. अनेकदा या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु असते. मुंबई आणि गोवा ही दोन मोठी आणि महत्त्वाची शहरं आहेत. या शहारांमध्ये अनेक पर्यटक येत असतात. पण या दोन शहरांना जोडणारा मुंबई-गोवा महामार्ग नेहमीच अतिशय दुरावस्थेत असतो. विशेष म्हणजे मुंबई-गोवा महामार्गाचा आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर चांगल्या प्रकारे तयार व्हावा यासाठी मनसे पक्ष आक्रमक झालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या आठवड्यात पनवेलमध्ये सभा पार पडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरुन सरकारवर निशाणा देखील साधला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्ते मुंबई-गोवा महामार्गासाठी आक्रमक झाले. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील टोलनाक्यांचीदेखील तोडफोड केली. त्यानंतर आता मनसेकडून एक नवा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

मुंबई-गोवा महामार्गावर सुरु असलेलं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्ता काँक्रिटचा असूनही या रस्त्यात सळईचा पुरेसा वापरच करण्यात आलेला नाही, असा दावा व्हिडीओतील मनसेच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. मनसेकडून याबाबत व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

मनसे नेत्याकडून व्हिडीओ जारी

मनसेचे पनवेल शहराचे महानगर शहाराध्यक्ष योगेश चिले यांनी हा व्हिडीओ जारी केलाय. जिथून मुंबई-गोवा महामार्ग सुरु होतो तिथे त्यांना एक धक्कादायक प्रकार समोर आला. “सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे रस्त्याच्या कामांमधून सर्वसामान्य नागरिकांना किती फसवत आहेत ते सर्वांना कळायला हवं म्हणून आपण हा व्हिडीओ जारी करत आहोत”, असं ते या व्हिडीओत आधी म्हणतात. त्यानंतर ते रस्त्याचं काम कशाप्रकारे निकृष्ट दर्जाचं सुरु आहे, असं ते व्हिडीओतून दाखवतात.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.