रात्री तीन वाजता फोनवरून धमकी देतात आणि…, वसंत मोरे यांचा गौप्यस्फोट
मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे दुसऱ्या दिवशीही भावनिक आणि अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळाले. आज बोलताना त्यांनी काही गौप्यस्फोटही केलेत. पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कुणीही यावर भाष्य करायचे नाही, असे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. यावर काय म्हणाले मोरे?
पुणे, १३ मार्च २०२४ : मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे दुसऱ्या दिवशीही भावनिक आणि अस्वस्थ असल्याचे पाहायला मिळाले. आज बोलताना त्यांनी काही गौप्यस्फोटही केलेत. पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कुणीही यावर भाष्य करायचे नाही, असे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. यावर वसंत मोरे यांना विचारले असता वसंत मोरे म्हणाले, कुणीही थांबले नाही, पक्षातील लोकं रात्री तीन, तीन वाजता कार्यकर्ते, शाखाध्यक्षांना फोन करुन धमकवत आहेत. पोस्ट डिलिट कर, असे सांगत आहे. पोस्ट का टाकली, त्याचा जाब विचारत आहे. हे प्रकार थांबले नाही तर मला राज साहेबांना सांगावे लागेल. साहेबांना कोण फसवत होते, ती नावे जाहीर करावी लागतील, असा इशाराही त्यांना कार्यकारणीतील त्या लोकांना दिला.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

