Special Report | कोर्टाच्या निकालानंतर, ठाकरे गटाचा मोठा दावा; शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार?
VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा उष:काल होणार? बघा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल देताना, सुप्रीम कोर्टानं निकालात जे मुद्दे मांडलेत, त्यानंतर ठाकरे गटानं आता पुन्हा पक्ष आणि चिन्हं आम्हालाच मिळेल, असा आशावाद व्यक्त केलाय. कारण निवडणूक आयोगाचे काही मुद्दे सुप्रीम कोर्टानं खोडून काढलेत. निवडणूक आयोगानं, 17 फेब्रुवारीला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदेंना दिलं. निवडणूक आयोगानं निकाल पत्रात म्हटलं होतं की 21 जून 2022 रोजी 55 पैकी 24 आमदार उद्धव ठाकरेंसोबत होते आणि त्याच दिवशी ठाकरे गटानं अजय चौधरींची गटनेतेपदी निवड केली आणि सुप्रीम कोर्टानं सत्तासंघर्षाचा निकाल देताना, अजय चौधरींची गटनेते म्हणून निवड योग्य ठरवली तर मुख्यमंत्री शिंदेंची गटनेते म्हणून निवड बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. शिंदेंच्या शिवसेनेनं प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची निवड केली. मात्र ही निवड सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. तसेच ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची निवड ही योग्य असल्याचं म्हटलं. त्यामुळे त्यांचाच व्हीप लागू होईल हेही स्पष्ट केलं. शिंदेंनी 55 पैकी 40 आमदार आणि 19 पैकी 12 खासदार असल्याचं सिद्ध केलं, परिस्थिती आणि पुरावे याच्या आधारे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना देण्यात येत आहे, असं निवडणूक आयोगानं म्हटलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा उष:काल होणार? संपूर्ण शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळणार? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

