Maharashtra Flood : राज्यात अतिवृष्टी अन् पिकांचे मोठे नुकसान, अडचणीत सापलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, कृषीमंत्र्यांची मोठी माहिती
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने 70 लाख एकरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बीड, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. राज्य सरकार पंचनामे युद्धपातळीवर करत असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीचा मोठा प्रादुर्भाव आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. माहिती देताना दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्यातील 70 लाख एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा सर्वाधिक प्रभावित आहेत. बीड, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीकाठच्या आणि ओढ्याकाठच्या जमिनींची माती वाहून गेली आहे. अनेक पशुधन आणि घरांनाही नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पंचनामे युद्धपातळीवर सुरू केले आहेत आणि दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर

