Air India Plane Crash : 242 प्रवाशांना लंडनला घेऊन निघालेलं प्लेन अहमदाबादेत क्रॅश, आतापर्यंत काय-काय घडलं?
एअर इंडियाचे विमान अहमदाबादेत कोसळलं आहे. या घटनेसंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोल यांनी ही माहिती दिलेली आहे. बघा आतापर्यंत काय-काय घडलं?
242 प्रवासी असलेले अहमदाबादमधून लंडनला जाणारे विमान कोसळल्याची मोठी घटना आज घडली. AI 171 हे विमान अहमदाबाद वरून लंडनला जात होतं. कॅप्टन सुमित सुभरवाल हे पायलट सीटवर होते. पायलट सुमित सुभरवाल यांनी मेडे अर्थात ए टी सी ला 1वाजून 39 मिनिटांनी इमरजन्सी कॉल दिला. ए टीकडून पायलटला लगेच संपर्क झाला मात्र पायलटकडून काहीही प्रतिसाद आला नाही. 1 वाजून 38 मिनिटांनी अहमदाबादवरून लंडनसाठी या विमानांनी टेकऑफ केलं. टेकऑफ नंतर अगदी पाचच मिनिटात खाली कोसळून या विमानाचा स्फोट झाला.
242 प्रवाशां सह दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्स या विमानात होते. 242 प्रवाशांमध्ये भारतीय 169, ब्रिटिश 53, पोर्तुगीज 7 आणि एक कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती आहे. 242 प्रवाशांमध्ये विमानात दोन बालकांचाही समावेश आहे. 242 प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी होते अशी ही माहिती आहे. 825 फूट उंचीवरून मेघाणी नगरच्या रहिवासी परिसरात एका इमारतीवर हे विमान कोसळलं. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला आणि आगीचा लोट हवेत उसळला. दरम्यान या अपघातात 20 पेक्षा जास्त मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
