शेतकऱ्याला टोमॅटोने केले लखपती; पाहा दीड एकर पिकातून किती कमावले…
अहमदनगरला भातोडी येथील शेतकऱ्याला दीड एकर टोमॅटोच्या शेतीतून दोन महिन्यात 40 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
अहमदनगर, 09 ऑगस्ट 2023| अहमदनगरला भातोडी येथील शेतकऱ्याला दीड एकर टोमॅटोच्या शेतीतून दोन महिन्यात 40 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. बबन धलपे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो गेल्या दहा वर्षापासून टोमॅटोचे उत्पन्न घेतोय, मात्र पहिल्यांदाच इतके विक्रमी उत्पन्न त्याला मिळाले आहे. यंदा त्यांच्या कष्टाचे चीज झाले असून त्यांना किलोला सरासरी 80 ते 100 रुपये भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे टोमॅटोसाठी लागवड, खत, औषध फवारणी, तारेचे कुंपण असा एकूण दोन ते अडीच लाखांचा खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात त्यांनी एक रुपया दराने देखील टोमॅटोची विक्री केली आहे, तर अनेक वेळा त्यांना रस्त्यावरती फेकून द्यावे लागले. मात्र यंदाच्या वर्षी उच्चांकी दर मिळाल्याने समाधान व्यक्त केला आहे.

