Imtiyaz Jaleel : मुलं 4 जन्माला घालायची की 19… जलील यांचा नवनीत राणा यांना खोचक टोला
इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांच्या 19 मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. त्यांनी मुस्लिमबहुल भागांतील अमली पदार्थांच्या वाढत्या व्यापारावर चिंता व्यक्त करत पोलीस आणि सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला. जलील यांनी एमआयएमची एकट्याने लढण्याची भूमिका स्पष्ट केली आणि आगामी निवडणुकांसाठी मतदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
मालेगावमध्ये आयोजित एका जाहीर सभेत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या 19 मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावर सडकून टीका केली. जलील यांनी राणांना त्यांच्या स्वतःच्या मुलांची संख्या लक्षात घेऊन आधी स्वतःच उदाहरण घालून देण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारची निरर्थक वक्तव्ये राजकारणात द्वेष पसरवतात आणि खरी विकास कामे, आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करतात, असे त्यांनी म्हटले.
यावेळी इम्तियाज जलील यांनी मुस्लिमबहुल भागांमध्ये वाढलेल्या अमली पदार्थांच्या व्यापारावर तीव्र चिंता व्यक्त केली. धुळे, मालेगाव, औरंगाबाद, बीड, मुंब्रा आणि भिवंडी यांसारख्या शहरांमध्ये पोलिसांच्या संगनमताने हा व्यवसाय सर्रास सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार आणि भाजप जाणूनबुजून या व्यवसायाकडे दुर्लक्ष करत असून, यामुळे युवा पिढी बरबाद होत असल्याचे जलील म्हणाले. अमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका

