Air India : एकामागून एक सुरूच… एअर इंडियाचं विमान टेकऑफ होणार तेवढ्यात पायलटच्या लक्षात आलं अन् रेनवेवरच…
हैदराबादच्या शमशाबाद विमानतळावर एक मोठा अपघात थोडक्यात टळला. मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि पायलटने विमान धावपट्टीवर थांबवले.
हैदराबादमधील शमशाबाद विमानतळावर एक मोठा अपघात थोडक्यात टळला. मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. पायलटच्या हा बिघाड लक्षात येताच पायलटने धावपट्टीवर विमान थांबवले. नेमक्या कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे हे विमान धावपट्टीवर थांबवावे लागले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु एअर इंडियाकडून प्रवाशांना तातडीने दुसऱ्या विमानातून मुंबईला पाठवण्याची व्यवस्था केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला होता, एअर इंडियाचे विमान कोसळले होते. त्या अपघातात २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. धक्कादायक म्हणजे विमान मेडिकल कॉलेजवर पडल्याने अनेक विद्यार्थ्यांचाही वेदनादायक मृत्यू झाला. अपघातानंतर, बहुतेक प्रवाशांची डीएनए मॅचिंगद्वारे ओळख पटवण्यात आली आहे आणि त्याचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहे.

तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले

'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती

डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ

अद्भूत... आंबोलीतील सौंदर्य, डोळ्यांचे पारणं फेडणारा नजारा एकदा बघाच
