Ahmedabad Plane Crash : ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, दुर्घटनेचं कारण कसं समजणार? सरकारचा मोठा निर्णय
ब्लॅक बॉक्स सध्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या देखरेखीखाली आहे आणि सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की ब्लॅक बॉक्सची बाह्य रचना मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे आणि जर ती काळजीपूर्वक हाताळली गेली नाही तर त्यात असलेला अंतर्गत डेटा खराब होऊ शकतो.
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. फ्लाईट क्रॅश झाल्यानंतर साधारण २८ तासांनी ब्लॅक बॉक्स सापडला. यासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवणार आहे. अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स आता अमेरिकेला पाठवला जाण्याची शक्यता आहे. ब्लॅक बॉक्समध्ये असलेले डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) वॉशिंग्टनमधील राष्ट्रीय सुरक्षा वाहतूक मंडळाच्या (NTSB) प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात येणार आहे. कारण भारतात त्याची रिकव्हरी शक्य नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर ब्लॅक बॉक्स हाती लागल्यानंतरही ब्लॅक बॉक्समधील डेटा अद्याप रिकव्हर झालेला नाही. या अपघातात ब्लॅक बॉक्सचेही बरेच नुकसान झाले आहे. अपघातादरम्यान किंवा पडल्यानंतर ब्लॅक बॉक्स खराब झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. तर विमान दुर्घटनेचं कारण शोधण्यासाठी सरकारने डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय केंद्र सरकारने अपघातग्रस्त विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर डिकोडिंगसाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेतला.

अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...

तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले

'त्या' प्रकरणावरून दमानिया भडकल्या अन् सरकारला केली कळकळीची विनंती

डबल डेक्करला आग अन् प्रवाशांनी बसमधून घेतल्या उड्या, थरारक व्हिडीओ
