AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash :  अस्ताव्यस्त जेवण्याची ताटं अन् विद्यार्थी... टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं

Ahmedabad Plane Crash : अस्ताव्यस्त जेवण्याची ताटं अन् विद्यार्थी… टेकऑफ नंतर काही क्षणात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं

Updated on: Jun 12, 2025 | 7:45 PM
Share

अहमदाबाद मधील बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर हे विमान कोसळलं. 20 पेक्षा जास्त मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हॉस्टेलवर विमान कोसळल्याने जवळपास 15 डॉक्टर जखमी झाल्याची देखील माहिती समोर येत आहे.

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचं विमान एक वाजून 38 मिनिटांनी अहमदाबाद लंडन येथे टेक ऑफ झालं. रनवेपासून थोड्या अंतरावर बीजे मेडिकल कॉलेजचं वसतीगृह आहे. विमानतळ उड्डाणानंतर पायलट समीर सभरवाल यांनी मेडे अर्थात इमर्जन्सी कॉल दिला. टेकऑफ नंतरच्या काही मिनिटात विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं.

विमान कोसळताच मोठा स्फोट होऊन आगीचे लोट उडाले. विमान कोसळलं तेव्हा वसतीगृहात मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी दुपारचे जेवण जेवत होते. या फोटोत दुर्घटनेमुळे अस्ताव्यस्त झालेल्या जेवण्याच्या प्लेट्स आणि इमारतीचे दृश्य दिसतायेत. विमानाचे जे चाक लँडिंग वेळी वापरले जात ते भिंत तोडून इमारतीत शिरलं. विमानाचा एक भाग हॉस्टेलच्या इमारतीला धडकून असा लटकला होता. दुर्घटनेवेळी हॉस्टेलमधील मुलं जेवत होती. अचानक मोठ्या विमान धडकून झालेल्या मोठ्या स्फोटाने संपूर्ण इमारतीत आगीचे लोट उठले. फक्त हॉस्टेलच नाही तर हॉस्टेलबाहेर उभी असलेली वाहने ही जळून खाक झाली.

Published on: Jun 12, 2025 07:45 PM