मुंबईकरांनो काळजी घ्या… तुम्ही कुठं राहतात? ‘या’ भागातील हवा अधिक विषारी
मुंबई उच्च न्यायालय, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने संध्याकाळी ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. असे असताना नागरिकांनी मात्र या नियमावलीकडे दुर्लक्ष करीत सायंकाळपासून सकाळपर्यंत फटाक्यांची आतषबाजी, त्यामुळे हवेतील प्रदूषण वाढले आणि गुणवत्ता खालावली
मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३ | पर्यावरणाच्या संर्वधनासाठी मुंबई उच्च न्यायालय, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने संध्याकाळी ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. असे असताना नागरिकांनी मात्र या नियमावलीकडे दुर्लक्ष करीत सायंकाळपासून सकाळपर्यंत फटाक्यांची आतषबाजी केली. अशातच फटाक्यांमुळे मुंबईत २७ ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडल्याने अग्निशमन दलाचीही तारांबळ उडाली. हे कमी की काय म्हणून, कचरा जाळल्याच्याही २३ तक्रारी पालिकेकडे दाखल झाल्यात. यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावल्याचे समोर आले आहे. मुंबईत एअर क्वालिटी सरासरी इंडेक्स २४४ पर्यंत पोहोचला. यामध्ये चेंबूर, मालाड, बीकेसी आणि बोरिवलीतील हवा अधिक विषारी असून या भागात ‘एक्यूआय’ ३०० च्या वर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईमधील नागरिकांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
