NCP Ajit Pawar : धनंजय मुंडे स्टार प्रचारक अन् अजितदादांच्या बीडच्या प्रचारसभेला दांडी!
बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या प्रचारसभांनी राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांच्या गैरहजेरीमुळे आणि अजित पवारांनी परळीचा उल्लेख टाळल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याचवेळी, अजित पवारांनी बीडमध्ये १५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत कठोर कारवाईचे संकेत दिले.
बीड जिल्ह्यात सध्या अजित पवारांच्या प्रचारसभांची रणधुमाळी सुरू आहे. या सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या तिसऱ्या प्रचारसभेलाही मुंडे गैरहजर होते. अजित पवारांनी आपल्या भाषणांमध्ये परळी किंवा धनंजय मुंडे यांचा उल्लेख टाळल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अजित पवारांनी अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, गेवराई आणि बीड या तालुक्यांमध्ये सभा घेणार असल्याचे स्पष्ट केले. याच सभेत अजित पवारांनी बीडमध्ये १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कणकवलीत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे, जिथे निलेश राणे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच पंकजा मुंडे यांनी सध्या राजकारणातून निवृत्त होणार नसल्याचे आणि चांगल्या पिढी घडवण्यावर भर देणार असल्याचे म्हटले.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

