Ajit Pawar : लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळणार की नाही? अजितदादांच्या सूचक वक्तव्याची चर्चा
बीडच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरूनही अजित पवार स्पष्ट बोलल्याचे पाहायला मिळाले. पीक कर्ज भरा असे म्हटल्यावर माझ्यावर काही जणांनी टीका केली. पण याबाबत मी जाहीरनाम्यात बोललो होतो, पण भाषणात कुठेही बोललो नव्हतो, असं दादा म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्यावर असताना एका कार्यकर्मात अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठं आणि सूचक वक्तव्य केलं आहे. महायुती सरकारने सुरू केली आणि लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. लाडक्या बहिणीला सरकारकडून सध्या 1500 रुपये देण्यात येत आहे, परंतू राज्याची आर्थिक परिस्थिती काळानुरूप सुधारेल तेव्हा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रूपये देण्याचा विचार करू, असं म्हणत अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा आश्वस्त केल्याचे पाहायला मिळाले. मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती कधी सुधारणार? आणि लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 नेमके कधी मिळणार हे मात्र अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रूपयांचे 2100 रूपये मिळण्यासाठी अजून वाट पाहवी लागणार असल्याचे चित्र दिसतेय. बीडमधील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

