‘बाप आखिर बाप… विधानसभेत बापच बाजी मारणार’, आत्रामांच्या मुलीचा शरद पवार गटात प्रवेश अन् कुणी केला मोठा दावा?
गडचिरोली अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम- हलगेकर शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गडचिरोलीतील अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप विरूद्ध लेक संघर्ष रंगणार आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम या आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणं हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात अजित पवार गट राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम या आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. पण त्यांच्या जाण्यानं आम्हाला काही फरक पडणार नाही. कारण बाप हा बापच असतो. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितके उमेदवार राहतील तितके सगळे निवडून येणारे उमेदवार आहेत आणि भाग्यश्री आत्राम या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तरी बाप आखिर बाप होता है, भाग्यश्री आत्राम यांचं डिपॅाझीट जप्त होणार’, असा दावाच राष्ट्रवादी अजित दादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी केला आहे. तर “विधानसभा निवडणूकीत वडील विरुद्ध मुलीच्या लढतीत बाप बाजी मारणार”, असंही त्यांनी म्हटले आहे.