बारामतीत अजित पवार यांची तुफान फटकेबाजी; बायको म्हणते, ‘जरा वयाचा विचार करा? पण…’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळी तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर पार पडलेल्या सभेत त्यांनी जोरदार टोलेबाजी केली.
बारामती (पुणे) : 27 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजप-शिंदे यांच्या सरकारमध्ये प्रवेश केला आणि ते पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले. यानंतर ते काल पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर होते. तर त्यावेळी तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी जोरदार आणि तडाखेबंद फटकेबाजी केली.
यावेळी आपल्या खास शैलीत तुफान फटकेबाजी करताना अजित पवार यांनी आपण सकाळी लवकर किंवा पहाटेच कामाला सुरुवात का करतो आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी काय तक्रार करतात हे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी त्यांनी, मी पहाटे ५ वाजताच बावचळून उठतोय. कामाला लागतोय. बायको म्हणते दमानं, दमानं घ्या. हे काय चाललंय? जरा वयाचा विचार करा. पण, वय वगैरे काही नसतं. कामामधून वेगळंच समाधान मिळतं, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

